स्वयम् : ऑनलाइन शिक्षणाचे उपयुक्त व्यासपीठ

0

जळगाव – भारताचे मानव संसाधन आणि विकास मंत्रालय आणि ए.आय.सी.टी. यांच्याद्वारे स्वयम् या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. यात मायक्रोसॉफ्टची देखील मदत घेण्यात आली आहे. स्वयम् हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने चालणारे शैक्षणिक उपक्रम असून हे उपक्रम मुक्स या शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. यासाठी https://swayam.gov.in/ हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती या उपक्रमात सहभाग नोंदणी करून शिक्षण प्राप्त करू शकतो.
यामध्ये शालेय शिक्षणापासून म्हणजेच नववीच्या वर्गापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याची वर्गवारी करण्यात आली आहे. त्याच्या पसंतीनुसार शिक्षणक्रमात प्रवेश घेऊ शकतो. यामध्ये जवळपास ४०० पेक्षा जास्त अभ्यासक्रम आहे. यातील कोर्स देशभरातून १००० पेक्षा जास्त सर्वोत्तम शिक्षकांनी तयार केले आहेत. तसेच सेवारत कोणत्याही शिक्षकासाठी विनामूल्य आहेत.

संकलन – डॉ.चंद्रशेखर वाणी
(ग्रंथपाल मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे)