स्वस्तधान्य दुकानात मास्क, हँण्डवॉश उपलब्ध करून द्या: चंद्रकांत पाटील

0

मुंबई: राज्यात कोरोन विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात कोरोना विषाणूचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वस्त धान्य दुकानावर सरकारने मास्क, हँण्ड वॉश उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विधानसभेत बोलताना पाटील म्हणाले, कोरोना व्हायरस महाराष्ट्रात सुद्धा आला असून पुण्यात रुग्ण आढळून आली आहे.

कोरोना व्हायरसचा धोका देशात वाढताना पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत या घटनांमध्ये वाढ झाली असून सर्वात जास्त परिणाम केरळमध्ये दिसून येत आहे

पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून मंगळवारी पाच असणारी बाधितांची संख्या आता आठवर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुण्यात आठ आणि मुंबईत दोन आणि आता नागपूरात एक अशा एकूण ११ व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.