हद्दपारी आदेशाचे उल्लंघण ; शम्मी चावरीयाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- हद्दपार असतानाही शहरात प्रवेश करून हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याने शम्मी प्रल्हाद चावरीया (24, वाल्मीक नगर, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिस पेट्रोलिंगवर असताना वाल्मीक नगरात हद्दपार झालेला आरोपी शम्मी चावरीया आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी निलेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध भादंवि 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.