हनुमान जयंतीवर ‘कोरोनाचे सावट’ : शिरसाळा हनुमान मंदिर राहणार बंद

0

बोदवड : जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेले शिरसाळा मारोती मंदिरावर ‘कोरोनाचे सावट’ आल्याने मंदिर बंद असणार आहे. 8 रोजी हनुमान जयंती असून भाविक शिरसाळा मारोती येथे लाखोंच्या संख्येत गर्दी करतात परंतु यंदा कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने उपाययोजनेसाठी गर्दीच्या ठिकाणांना बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून निर्गमित झाले आहेत. 4 रोजी बोदवड पोलिस ठाण्यातर्फे श्री क्षेत्र हनूमान मंदिर ट्रस्ट शिरसाळे यांना नोटीस देण्यात आली. 8 रोजी हनूमान जयंती असल्याने शिरसाळा मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 नूसार मंदिरात भाविकांची गर्दी होणार नाही याबाबत उपाययोजना करावी. आपले स्वयंसेवक नेमून मंदिराकडील येणारे रसत्यांवरच भाविकांना परत पाठवावे. शासन स्तरावरुन निर्गमित आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे, आदेशाचे ऊल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जनसमूदाय एकत्र दिसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसीत नमूद आहे. यंदा कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासकिय स्तरावरुन विशेष प्रयत्न सुरू आहे. शासनाला व पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे शिरसाळा हनूमान मंदिर पुर्णपणे बंद आहे. येत्या 8 तारखेला हनूमान जयंती असल्यामूळे कोणत्याही भाविक भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये, शिरसाळा मारोती रायाकडे येणारा मार्ग बंद करण्यात येणार असून जो विनाकारण गर्दी करतील त्यांच्यावर ट्रस्टकडून कारवाई करण्यात येणार आहे.