हरियाणा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; १० मंत्र्यांनी घेतली शपथ

0

चंदिगड : महाराष्ट्रासोबत निवडणुका झालेल्या हरयाणामध्ये सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. भाजपा-जननायक जनता पार्टीने एकत्र येऊन हरियाणामध्ये सरकार बनवले. आज गुरुवारी 14 रोजी 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपाच्या कोट्यातून आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर जेजपीच्या एका आमदाराने आणि अपक्ष असलेल्या एक आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव आर्या यांनी मंत्र्यांना शपथ दिले.

या दहा मंत्र्यांमध्ये आधीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले अनिल विज यांचा समावेश आहे. याशिवाय, कंवरपाल गुर्जर, मूलचंद शर्मा, रंजीत सिंह, जेपी दलाल, बनवारी लाल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर ओम प्रकाश यादव, कमलेश ढांडा, अनुप धानक आणि माजी हॉकी खेळाडू संदीप सिंह यांनीही राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पदाची शपथ घेतली आहे. हरयाणात भाजपाने जेजेपीचा पाठिंबा घेत दिवाळीच्या मुहूर्तावर सत्ता स्थापन केली. त्यावेळी सगल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपाचे नेते मनोहर लाल खट्टर यांनी घेतली होती. तसेच जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.