हातावर पोट असणाऱ्यांसाठी अमळनेरची तरूणाई सरसावली ।

0

अमळनेर:

आज कोरोना या आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले आहे आणि यावर उपाय म्हणून प्रत्येकाने स्वतःला होम क्वारणटाईन करून घ्यायचे आहे असा आदेश भारत सरकारकडून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात रुग्णाची संख्या जास्त असल्या कारणाने राज्य सरकार देखील खूप गांभीर्याने ही परिस्थिती हाताळते आहे.संचारबंदीमुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे मात्र या परिस्थितीशी दोन हात करताना काही लोक जे रोज कमवतात रोज खातात यांच्यावर उपासमारीची वेळ आलेले आहे, त्यासाठी अमळनेर शहरातल्या काही होतकरू तरुणांनी स्वखर्चाने त्यांची भूक भागवण्यासाठी पुढाकार घेत माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

अनिकेत पवार,सागर ठाकूर,मनोज माळी,पराग वाडे, योगेश सोनार,जयेश बडगुजर,तुषार ठाकूर,प्रमोद शिंपी,अजय पवार,विनायक बडगुजर,नितेश सोनार,कृष्णा सोनार हे रोज दिवसातून दोनवेळा शहरातील गरजूंना फूड पाकिटे ,सकाळी नाश्ता,चहा वाटप करत आहेत .