हिंगणघाट पिडीतेचा पार्थिव गावात दाखल; रुग्णवाहिका, पोलिसांवर दगडफेक !

0

मुंबई: हिंगणघाटमधील पीडित तरुणीचा आज मृत्यूशी झुंज संपला. आज सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे.राजकीय नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळेच संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान पोलीस बंदोबस्तात तरुणीचा पार्थिव शरीर दारोडा या गावात आणण्यात आले असून गावकऱ्यांचा तीव्र संताप दिसून येत आहे. गावकऱ्यांनी पार्थिव शरीर गावात येऊ नये यासाठी तयारी केली होती. रस्त्यावर लाकूड आडवे ठेवण्यात आले आहे. जमलेल्या समुदायांनी पोलिसांच्या दिशेने तसेच रुग्णवाहिकेच्या दिशेने दगडफेक करण्यात आली आहे. जमलेला जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी मार देखील यावेळी केला आहे.

आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत तरुणीचा पार्थिव शरीर ताब्यात न घेण्याची भूमिका पीडितेच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी पार्थिव शरीर ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी मूळ गावी दारोडा येथे नेले आहे.