दहिगावच्या तरुणाची कोळन्हावी जवळील तापी पात्रात आत्महत्या

0

यावल : तापी नदीच्या पुलावरून उडी मारून दहिगावच्या 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. आत्महत्या करणार्‍या व्यक्तीची तापी पुलावर आढळलेल्या दुचाकीवरून ओळख पटली. हरीषचंद्र दिलीप धनगर (बाविस्कर, व 23, रा.दहिगाव, ता.यावल असे मयताचे नाव आहे.
असे मृताचे नाव असून त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. कोळन्हावी (विदगावजवळ) गावाच्या पुढे असलेल्या तापी नदीच्या पुलावरून मंगळवारी सकाळी हरीषचंद्र बाविस्कर या तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. तापी नदी पुलावरून जाणार्‍या-येणार्‍यांनी तापी पात्रात अनोळखीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिस प्रशासनाला माहिती कळवली तर तापी पुलावर मयताची दुचाकी (एम.एच.19 एजी 6122) आढळल्यानंतर दुचाकीच्या क्रमांकावर मयताची ओळख पटवण्यात यश आले. मयत हरीषचंद्र हा दिलीप बाविस्कर यांचा मुलगा आहे. त्याच्या पश्‍चात वडील, दोन बहिणी व मोठा भाऊ असा परीवार आहे. आत्महत्येप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.