हिंगोणा शिवारात विहिरीत आढळला मृतदेह

0

फैजपूर- यावल तालुक्यातील हिंगोणा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शेत मालक सुरेश सुपडू पाटील यांच्या शेतातील विहिरीत अनोळखी इसमाचा मंगळवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मयत इसमाचे वय अंदाजे 35 वर्षीय असून पाच ते सहा दिवसांपासून त्याचा विहिरीत मृतदेह पडून असल्याचा संशय आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.