हिंगोण्यासह सांगवीत वीज चोरी : यावल पोलिसात गुन्हा दाखल

0

यावल : गेल्या सहा महिन्यात वीज विद्युत वितरण विभागाच्या तारांवर आकोडे टाकून तालुक्यातील हिंगोणे येथील दोन जनांनी तीन हजार 362 रुपयाची 373 युनिट तर सांगवी बुदु्रक येथील तिघांनी तीन हजार 69 रुपयाची 340 युनिट अशा दोन गावातील पाच जनांनी 713 युनिटची सहा हजार 431 रुपयांची विज तारांवर आकोडे टाकून विजचोरी केल्याने विज वितरण कंपनिकडून येथील पोलीस ठाण्यात विद्युत वितरण कायदा 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गेल्या सहा महीन्यापासून तालुक्यातील हिंगोणा येथील किशोर सत्तारसींग पाटील, वसंत काशिनाथ सोनवणे यांनी तीन हजार 362 रुपयाची 373 युनिटची तर सांगवी बुद्रुक येथील अकबर इलीयास तडवी, समाधान सायबु भिल, राजु मनोहर मीस्त्री यांनी तीन हजार 69 रुपयाची 340 युनिटची अशी पाच जनांनी 713 युनिटची सहा हजार 431 रुपयांची विज वितरण कंपनिच्या विज तारावर आकोडे विज चोरी केल्या बद्यल फैजपुर विज वितरण उपविभागीय युनिटचे हिंगोणा कक्षाचे सहा. अभियंता तुषार महाजन व सांगवी बुदु्रकचे सहा. अभियंता भैरवलाल अशोक पाटील या दोघांच्या स्वतंत्र फिर्यादिवरून शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हयाची नोंंद करण्यात आली . हिंगोणा येथील गुन्हयाचा तपास फैजपुर पोलीस ठाण्याकडे तर सांगवी बुद्रुक येथील गुन्हयाचा तपास येथील सहा. फौजदार अजीत शेख करीत आहेत.