हिंजवडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक 25 हजारांची लाच घेताना ताब्यात

0

पिंपरी :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाला 25 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई झाली असून, त्याबाबत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलन कुरकुटे असे लाच घेताना पकडलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुटे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान, तक्रारदार यांच्याकडून सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडजोडीकरिता 25 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. एसीबीने केलेल्या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी लाच कशासाठी घेतली हे समजू शकलेले नाही. मात्र, एसीबीचे एक पथक त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले आहे.