हिंदू विरोधी वक्तव्य: सोनिया गांधी, शरद पवारांनी माफी मागावी; भाजपची मागणी

0

नवी दिल्ली: काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू विरोधी वक्तव्य केल्याचे आरोप करत त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपकडून होत आहे. अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याबद्दल पक्षाचे अध्यक्षा सोनिया गांधी, शरद पवार यांनीही माफी मागावी अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

समझोता एक्सप्रेसच्या स्फोटावेळी काँग्रेसने हिंदू दहशतवाद शब्द उल्लेख केला होता. १९४९ मध्ये काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराचा विरोध केला तेव्हापासून आजतागायत राम मंदिर उभं राहिलं नाही. काँग्रेसने नेहमी हिंदू विरोधात काम केलं आहे. मुस्लिमांना गोंजरण्यासाठी काँग्रेसने हिंदूंचा अपमान केला. मुस्लिमांचाही राजकारणासाठी सोयीस्कर वापर केला गेला. त्यामुळे काँग्रसचे नाव बदलून मुस्लीम लीग काँग्रेस असे करावे असेही संबित पात्रा यांनी सांगितले.