हुतात्मा मेजर कौतुभ राणे यांना प्रभात शौर्य पुरस्कार

0

पुणे : शिवजयंतीनिमित्त गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळतर्फे शहराच्या पूर्व भागात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून 2019 चा प्रभात शौर्य पुरस्कार हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे आणि हुतात्मा मेजर शशिधरन नायर यांना जाहीर झाला आहे. 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौक येथे हा सोहळा रंगणार आहे. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे आणि हुतात्मा मेजर शशिधरन नायर यांच्यावतीने त्यांचे कुटुंंबीय हा पुरस्कार स्विकारणार आहेत. यावेळी तामिळनाडू तंजावरचे शिवाजीरावे भोसले, परम शक्तिपीठाच्या संघटन मंत्री साध्वी सत्यप्रिया उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उत्सव प्रमुख रविंद्र भन्साळी, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते. मानपत्र, रोख 11 हजार रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.