Wednesday , December 19 2018
Breaking News

हेतू साध्य होत नसेल तर महामंडळ बरखास्त करा

वैधानिक विकास मंडळावरून खडसेंनी सरकारला खडसावले

मुंबई:- सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून नेहमीच धारेवर धरणाऱ्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी देखील सरकारला चांगलेच झापून काढले. वैधानिक विकास महामंडळाचे अस्तित्वच शिल्लक राहिले की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. वैधानिक विकास महामंडळाला निधी दिला जात नाही त्यामुळे ज्या गोष्टीसाठी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. मात्र हेतूच साध्य होत नसेल तर वैधानिक विकास महामंडळ बरखास्त करा, असे म्हणत खडसे सरकारला चांगलेच खडसावले.

मराठवाडा वैधानिक विकास मंडळ,विदर्भ वैधानिक विकास मंडळ आणि उर्वरीत महाराष्ट्र विकास मंडळ यांचा २०१६-२०१७ या वित्तीय वर्षातील योजनेअंतर्गत आणि योजनेत्तर योजनावरील वैधानिक विकास मंडळ निहाय प्रत्यक्ष खर्चाचा तपशील सभागृहासमोर ठेवण्यात आला. वैधानिक मंडळाच्या संदर्भातील कागदपत्रे सभागृहासमोर ठेवली जात असतांना खडसे यांनी उभे राहत प्रश्न उपस्थित केला.

खडसे हे बराच वेळ उभे असतांना देखील त्यांना बोलण्याची संधी मिळत नव्हती. अध्यक्षांची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी खडसे यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी बोलतांना एकनाथ खडसे यांनी वैधानिक विकास मंडळाच्या मुद्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही विभागा-विभागातील असमसोत दूर करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. मात्र या वैधानिक विकास मंडळांचे अस्तित्वच आहे की नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली अाहे. विकासाचा जो असमतोल होता तो असमतोल दूर झाला आहे का या बाबतची माहिती सरकारने सभागृहाला देणे आवश्यक आहे.आमच्या भागाचा विकास झालेला नसतांना वैधानिक विकास मंडळाकडे दुर्लक्षच करण्यात येत असेल तर वैधानिक विकास मंडळ बरखास्त करा अशी मागणी खडसे यांनी सरकारकडे केली.

वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षाची नियूक्ती केली जात नाही तसेच त्या मंडळावर संचालकांची नेमणूक देखील केली जात नसल्याचे सांगत खडसे यांनी सरकारला चांगलेच सुनावले. यावेळी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी या प्रश्नाला उत्तर देत असतांना सांगितले की राज्यांच्या राज्यपालांनी तज्ञ संचालकांची नियूक्ती केलेली आहे आणि राज्यपालांच्या सूचनेप्रमाणेच वैधानिक विकास मंडळाचे काम सुरू असल्याचे सांगितले.

About admin

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!