हैदराबाद संघाने ‘म्होरक्या’ बदलला; कर्णधारपदाची धुरा वॉर्नरकडे !

0

मुंबई: आयपीएल 2020 चा थरार एप्रिलपासून सुरु होणार आहे. संघ जाहीर झाले आहे, आता फक्त चाहत्यांना स्पर्धा सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. आगामी मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाने कर्णधारपदाची खांदेपालट केली आहे. केन विलियम्सनकडे असलेली नेतृत्वाची जबाबदारी काढून ती आता डेव्हीड वॉर्नरकडे देण्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने आज गुरुवारी ही घोषणा करण्यात आली आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघ दोन मोसम खेळला. 2016मध्ये वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादनं आयपीएल जेतेपद पटकावलं होतं. आता पुन्हा त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. मागील मोसमात हैदराबादला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. वॉर्नर आणि विलियम्सन या दोघांनाही आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात मार्चमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे.

असा आहे संघ
डेव्हीड वॉर्नर (कर्णधार),अभिषेश शर्मा, बसील थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धीमान सहा, पियाम गर्ग, विराट सिंग, मिचेल मार्श, फॅबीयन अॅलन, संदीप बवानका, संजय यादव, अब्दुल समद