हॉकर्सचे जप्त केलेले साहित्य मनपाच्या प्रांगणातून गायब

0

जळगाव: शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरु आहे. या मोहीमेदरम्यान हॉकर्सच्या हातगाड्यासह साहित्य जप्त करुन मनपाच्या पार्किंगमध्ये ठेवल्या जाते.मात्र त्याठिकाणाहून जप्त केलेले साहित्य जप्त होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उपायुक्त अजित मुठे यांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांना धारेवर धरले.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून शहरातील विविध रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. मनपाचे उपायुक्त अजित मुठे यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरु आहे. गेल्या काही दिवसात शहरातील अनेक हातगाड्या, स्टॉल, बॅनर सह इतर साहित्य मनपाच्या पथकाकडून जप्त करण्यात आले. हे साहित्य जप्त केल्यानंतर महानगरपालिकेच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या जागेत ठेवण्यात येते. मात्र, या ठिकाणी ठेवण्यात आलेले साहित्य तेथून कोणतही पावती न फाडता ल घेवून जात असल्याचे समोर आले आहे. सोमवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने शिवाजीनगर, ममुराबाद नाका, फ्रुट गल्ली येथून काही साहित्य जप्त केले होते. हे साहित्य मनपाच्या आवारात ठेवण्यात आले परंतु त्यानंतर काही मिनिटातच हे साहित्य येथून एक छोटा हत्ती आणि एक पॅजो रिक्षातून नेण्यात आले. ही बाब मनपा उपायुक्त मुठे यांना माहित होताच त्यांनी सुरक्षा रक्षक आणि अतिक्रमण फथकातील कर्मचार्‍यांना जाब विचारला. तसेच कारवाईचा इशारा देखील दिला.