होमगार्डचा प्रामाणिकपणा ; सापडलेली पैशांची पिशवी दिली पोलीस ठाण्यात

0

जळगाव : एकीकडे जिल्ह्यात तसेच शहरात पैशांची दरोडा, चोरीच्या घटना समोर येत आहे. तर दुसरीकडे होमगार्ड गजानन साहेबराव पाटील रा.राधाकृष्णनगर, जळगाव यांनी नवीन बसस्थानकात कॅन्टींगजवळ 18 हजार रुपये रोख, खाद्य पदार्थ, कपडे तसेच सौदर्य प्रसाधनाचे साहित्य असलेली कापडी पिशवी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमा करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.

नवीन बसस्थानकात सोमवारी होमगार्ड गजानन साहेबराव पाटील हे कर्तव्य बजावत होते. यादरम्यान त्यांना सायंकाळी 5 वाजता पोलिस चौकीजवळ असलेल्या कॅन्टींगच्या पायरीवर एक कापडी पिशवी बेवारस स्थितीत आढळली. पाटील यांनी पोलीस चौकीत कार्यरत असलेल्या जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे राजेश मेढे यांना प्रकार कळविला. त्यांनी आगारप्रमुखांना माहिती दिली. बसस्थानकात ध्वनीप्रक्षेपाकाद्वारे थैली सापडली घेऊन जाण्यासाठी आवाहन केले. मात्र कुणीही न आले नाही. अखेर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. ही पिशवी ज्याची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हापेठचे हवालदार शिवाजी वराडे यांनी केले आहे.