१०-१५ अपक्ष आमदार आमच्या संपर्कात: रावसाहेब दानवे

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आह. महायुतीला १६० जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला १०५ जागांवर विजय मिळाला आहे. इतर आणि अपक्ष असे २७ उमेदवार विजयी झाले आहे. दरम्यान यातील १०-१५ अपक्ष विजयी उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जनतेने आम्हाला चांगला कौल दिला आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला फारशे यश मिळालेले नाही, तरीही ते का खुश आहे हे कळत नाही? असा टोलाही दानवे यांनी लगावला. एका वृत्तवाहिशी बोलताना त्यांनी भाष्य केले.

सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आहेत, तेच पक्षासाठी सक्षम प्रदेशाध्यक्ष आहेत असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.