Friday , February 22 2019

२५ हजार महिलांनी एकत्र येत केला गणरायांचा नामजप

पुणे-पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल २५ हजारहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली.

गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या महिलांचा आनंदही पाहण्याजोगा होता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्यास फिनोलेक्स ग्रुपचया रितू छाब्रिया, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार नीलम गोऱ्हे, एमएनजीएलचे सुनील सोनटकके, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या आणि ३० देशातील परदेशी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!