८० हजार थकबाकीदारांना जप्तीची नोटीस

0

पिंपरी-कर संकलन विभागामार्फत ज्या मिळकतधारकांकडे थकबाकी आहे, अशा 80,000 मिळकतधारकांना जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिळकत कराची थकबाकी असणा-या मिळकतधारकांनी जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजाविल्यानंतरही 7 दिवसाचे आत मिळकत कराची रक्कम भरणा केलेली नाही, अशा मिळकतधारकांवर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाने दिली आहे.

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तात्काळ थकबाकीसह कराची रक्कम भरावी, असे आवाहन कर संकलन विभागाचे स. आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी केले आहे. आजअखेर करसंकलन विभागाकडे 5 लाख 6 हजार 927 मिळकतीची नोंद आहे. त्यापैकी 2 लाख 90 हजार 316 मिळकतधारकांनी 397.50 कोटी रुपये मिळकतकराचा भरणा केला आहे. सर्व मिळकतधारकांकडून मिळकत कर वसूल करण्याच्या दृष्टीने मिळकत जप्तीची कार्यवाही सुरु करण्यात येत असून मिळकतधारकांनी मिळकत कराचा भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन डॉ. आष्टीकर यांनी केले आहे.

नागरिकांच्या सोईसाठी 31 मार्चपर्यंत सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीचे दिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत.