व्हीव्हीपॅटच्या प्रशिक्षणाला 709 पैकी 11 कर्मचारी गैरहजर

0

प्रशासनाने निवडणुकीच्या कामाला दिला वेग : कर्मचार्‍यांचे आजही प्रशिक्षण

भुसावळ:ि निवडणुकीतील प्रचाराला ज्या प्रमाणे वेग आला आहे त्याच प्रमाणे प्रशासनानेही निवडणुकीच्या अत्यावश्यक कामाला वेग दिला आहे. यामध्ये निवडणुकीतील सहभागी कर्मचार्‍यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी म्युन्सीपल हायस्कुलमध्ये 709 कर्मचार्‍यांना व्हिव्हिपॅटचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी 11 कर्मचारी गैरहजर होते.

कर्मचार्‍यांना दोन दिवसीय प्रशिक्षण

भुसावळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीच्या कामात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांना दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. यातील पहिल्या दिवसाच्या प्रशिक्षणात सकाळी आठ वाजता पांडुरंग टॉकीजमध्ये कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या कामकाजाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकारी व मास्टर्स ट्रेनर्स यांना मार्गदर्शन केले. यानंतर 11 वाजता जामनेर रोडवरील म्युन्सीपल हायस्कुलमध्ये कर्मचार्‍यांना व्हिव्हिपॅट मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला 709 पैकी 11 कर्मचारी गैरहजर होते. रविवारीही कर्मचार्‍यांना शनिवार प्रमाणेच प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी सुचना दिली आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामाला वेग दिला आहे तसेच निवडणुकीतील मतदान प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचा घोळ निर्माण होणार नाही याचीही दक्षता घेतली जात आहे.