Wednesday , December 19 2018
Breaking News

1300 शाळा बंद केल्या नाहीत, तर त्यांचे समायोजन केले

मुंबई । राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या 1300 शाळा बंद नाही, तर त्यांचे 1 किलोमीटर अंतराच्या परिसरातील इतर शाळांमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या सहली, गॅदरिंग आदी गोष्टी होत असल्याने त्यांच्या अभ्यासाला गती मिळत असल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला तसेच या शाळांबाबत निर्णय घेण्याकरिता केंद्र सरकारचे रॅशनल ऑफ स्मॉल स्कूलचे परिपत्रक आहे. युनिसेफने याचा अभ्यास करून काही सुधारणा केल्या होत्या. त्या धर्तीवर 1292 शाळा सिलेक्ट करून 12 पेक्षा कमी पटसंख्यांच्या शाळा निवडल्या. त्यासाठी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकार्‍यांना विचारणा केली. यापैकी 568 शाळांचे समावेशन 1 कि.मी. अंतरातील इतर शाळांमध्ये समाविष्ट केल्या, तर 343 शाळांचे अद्याप केलेल्या समावेशन केलेले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभेत 293 अन्वये विरोधकांची राज्यातील शैक्षणिक परिस्थितीविषयीचा प्रस्ताव मांडला. त्यावर अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, सुनील प्रभू यांच्यासह अन्य सदस्यांनी आपली मते मांडली. ब्रिटीश सरकार आणि टाटा सोशल सायन्सच्या माध्यमातून राज्यातील शाळामध्ये इंग्रजी भाषेच्या ज्ञानाच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच त्याचे प्रशिक्षणही शिक्षकांना देण्यात येत आहे. आतापर्यंत माध्यमिक शाळांच्या 15 हजार शिक्षकांचे ट्रेनिंग दिल्याचे त्यांनी सांगितले. मातृभाषेतून शिक्षण या उपक्रमाला प्राधान्य दिल्याने विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी होत असून इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे 25 हजार विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमात आल्याचे त्यांनी सांगितले.

आरटीईअंतर्गत 60 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
राज्यातील शाळांमध्ये 96 स्वच्छतागृहे तर मुलींसाठी 96 टक्के आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या कारणावरून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना किंवा शाळा सोडायची वेळ येणार नाही. याशिवाय शासकिय शाळांच्या अखत्यारीत असलेल्या शाळांच्या वीज बिलाची रक्कमही यापुढे राज्य सरकारकडून भरण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. आरटीई कायद्याखाली राज्यात 60 ते 70 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. सन 2012-13, 13-14 यावर्षी शाळांना त्यांची बीलेच दिली नव्हती.

गळतीचे प्रमाण 11 वरून 6 टक्क्यांवर आले
गणित विषय सहजसोप्या भाषेत समजू सांगता यावे या उद्देशाने आयआयटीच्या माध्यमातून नवी पद्धत आणण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच चार भिंतीच्या बाहेर नेऊन शिक्षण देणार्‍या शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील शाळांमधील गळतीचे प्रमाण 11.30 टक्क्यांवर होते. आता हे प्रमाण 6.57 वर आणले आहे, तर शाळांमधील मुलींचे प्रमाण 6.61 खालीपर्यंत आणले आहे तसेच पुढच्या तीन वर्षांत याचे प्रमाण 5 पेक्षा आणणार असल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाणही खालीपर्यंत आणणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर 26 जानेवारीला एनएनसीच्या निमित्ताने दिल्ली येथील परेडसाठी जाणार्‍या, कलागुण सादर करण्यासाठी परदेशी किंवा देशांतर्गत जाणार्‍या आणि खेळासाठी शाळेच्या बाहेर जाणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी 25 गुण अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

About admin

हे देखील वाचा

१० वर्षापूर्वीच्या आंदोलन प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन !

मुंबई-२००८ मध्ये करण्यात आलेल्या परप्रांतीयांविरोधातील आंदोलन प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना इगपुरी न्यायलयाने जामीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!