Tuesday , March 19 2019

श्रीगोंदा :काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयात एम्बेडेड सिस्टम आणि रोबोटिक्स या  विषयाच्या ई-यंत्र या  नूतन प्रयोगशाळेचे संस्थेच्या अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अनुदानातूनतून व भारतीय प्रौद्योगिकी संस्थान अर्थात आई आई टी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ई-यंत्र प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना पाचपुते म्हणाल्या की, परिक्रमा संकुल अत्याधुनिक तंत्रज्ञान  विद्यार्थ्यांना शिकायला मिळावे यासाठी कायम प्रयत्नशील असते. या ई-यंत्र प्रयोगशाळेमुळे परीक्रमाचे विद्यार्थी व शिक्षक आई आई टी शी जोडले जाणार आहे.  हि नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी असणार्या प्राध्यापकांच्या संघाचे अभिनंदन केले.
आयआयटी मुंबई यांनी व्हिडीओ कोन्फरांसिंग ने आयोजित केलेल्या या उद्घाटन सोहळ्यात देशाच्या विविध भागांमधून अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी झाली होती. भारताच्या मनुष्य बळ विकास मंत्रालय यांच्याकरिता  आई आई टी मुंबई यांनी रोबोटिक्स व एम्बेडेड सिस्टम या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुधीर दिवेकर, ओमप्रकाश बारडोल, प्रशांत मोरे व सचिन हिरणवाळे या प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर आई आई टी मुंबई यांनी ठरवून दिलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये  मध्ये परीक्रमाचा संघ  विशेष प्राविण्य मिळवल्याने  अनुदानास पात्र ठरला. देशभरातून सहभागी झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रम व स्पर्धेमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयामधून  परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने अ श्रेणी प्राप्त केली.  त्यानंतर आई आई टी मुंबई व परिक्रमा यांच्या संयुक्त विद्यमाने या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी सदर प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली. या ई-यंत्र प्रयोगशाळेमध्ये आई आई टी मुंबई मधील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नवीन तंत्रज्ञान , विविध संकल्पना परीक्रमाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
परीक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी यावेळी अत्याधुनिक असणारे एम्बेडेड व रोबोटिक्स तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात शेती उद्योगामध्ये वेळेची, पैश्यांची बचत करण्याबरोबरच  व कमी श्रम या तंत्रज्ञानामुळे श्यक्य असल्याचे सांगितले. शेती क्षेत्राचे अत्याधुनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाला कल्पनाशक्तीची जोड देणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.  या प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी प्रतापसिंह पाचपुते व प्राचार्य अमोल खेडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. या उद्घाटन समारंभासाठी परीक्रामाचे संचालक डॉ. सोमशेखर श्याले, व्यवस्थापन शास्त्र शाखेचे संचालक डॉ तानाजी दबडे , प्रा. संजीवन महाडिक, प्रा. मोहन धगाटे , डॉ. सुदर्शन गिरमकर यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन हिरणवाळे यांनी आभार मानले
Spread the love
  •  
  • 100
  •  
  •  
  •  
    100
    Shares

हे देखील वाचा

रावेर मतदारसंघातून खा. रक्षा खडसेंची उमेदवारी निश्‍चित

जळगाव । जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी निश्‍चित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!