0

पिंपरी चिंचवड ः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची 65 हजार 310 युनिट्स 15 लाख 63 हजार 930 रुपयांची वीजचोरी गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश लक्षण झगडे, योगेश चंद्रकांत झगडे, हृषीकेश चंद्रकांत झगडे (सर्व रा. झगडे वस्ती, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्ये (वय 49, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 24 जुलै 2018 ते 25 जानेवारी 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीजचोरी केली. 65 हजार 310 युनिट्स 15 लाख 63 हजार 930 रुपयांची वीजचोरी केल्याबद्दल भारतीय विद्युत कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.