Wednesday , February 20 2019
Breaking News

20 लाख एलईडीनी उजळणार महाराष्ट्र!

वीज बिलात 50 टक्के बचत होणार

मुंबई । महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना येणार्‍या वीज बिलाच्या रकमेत बचत होण्याकरिता राज्याच्या ऊर्जा विभागाकडून एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने शहर, तालुका आणि जिल्ह्यात अतंर्गत रस्त्यांवर तब्बल 20 लाख एलईडीच्या दिवे बसविण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईईएसएल आणि ऊर्जा विभागादरम्यान बुधवारी दुपारी सांमज्यस करार करण्यात आला आहे.

ही लोकशाहीची क्रूर चेष्टा
केंद्र सरकारच्या स्ट्रीट लाईटींग प्रोग्राम अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 20 लाख एलईडीचे दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नांदेड या शहरांमध्ये एलईडीचे दिवे बसविले जातील. तर यापूर्वी वापरण्यात आलेल्या दिव्यांना कायमची सुट्टी देण्यात येणार आहे. जवळपास 394 शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने एलईडीचे दिवे लावण्यात येणार आहेत.

सर्व जबाबदारी कंपनीची
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वीज बिलात 50 टक्के बचत होणार आहे. याशिवाय, एलईडी दिवे बसविणे, त्याची देखभाल करणे, दुरूस्ती करणे, वॉरंटीमध्ये अदलाबदल करून देणे आदी बाबींची जबाबदारी ईईएसएल कंपनीवर राहणार आहे. तसेच एकदा दिवे बसविल्यानंतर सेंट्रल कंट्रोल मॉनिटरींग सिस्टीम या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे वीजबंद होण्याची शक्यता कमी राहील.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

शिंदखेडा पंचायत समितीचा लघूसिंचन अभियंता एसीबीच्या जाळ्यात

योजनेच्या लाभासाठी चार हजारांची लाच भोवली ; धुळे एसीबीची कारवाई शिंदखेडा- एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!