गिरड येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

0

पाचोरा: बाळू कोळी (३३) गिरड हा शेतकरी लोण प्र.ग. उतरण शिवारात स्वतःच्या शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी गेला असता सर्पदंश झााला. तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारसाठी नेण्यात आले. पुढील उपचारासाठी पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तीन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्याच्या पश्चात आई वडील ,चार बहिणी पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात  वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिला.