Sunday , March 18 2018

275 दिव्यांगांवर मोफत उपचार करून बसविले कृत्रिम पाय

शहादा । येथील संकल्प ग्रुप व मानव सेवा समिती सूरत तर्फे 275 दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय (जयपुर फुट) रोपण करुन देण्यात आले. संकल्प ग्रुप शहादा व मानव सेवा समिती सूरत यांच्या सयुंक्त विद्यमाने वलसाड येथे पार पडलेल्या कृत्रिम पाय(जयपुर फुट)रोपण शिबिरात महाराष्ट्र ,गुजरात राज्यातील 275 रुग्णावर उपचार करण्यात आला. त्यापैकी 35 लाभार्थी शहादा परिसरातील होते. या लाभार्थीचा औषध उपचराचा खर्च संकल्प ग्रुप ने करित त्यांना मोफत कृत्रिम पाय बसवून देण्यात आल्याने काही अंशी त्यांचे अपंगत्व कमी करण्यात मदत केली.

शहाद्यातील 35 जणांना मदत
नोव्हेंबर महिन्यात संकल्प ग्रुप च्या सदस्यानी तालुक्यात जनजागृती करीत डिसेंबर महिन्यात जयपुर फुट रोपण प्रकल्प घेण्यात येणार असल्या बाबत नागरिकांना माहिती दिली होती या मोहिमेला प्रतिसाद देत महीन्या भराच्या कालावधीत 35 दिव्याग्यांनी ग्रुप शी संपर्क साधत शिबिरात सहभागी होण्याबाबत कळवीले होते त्याबाबत वलसाड येथे अस्थिरोग तज्ञाच्या मार्गदर्शना खाली नुकतेच चार दिवसीय शिबिर घेण्यात आले.

नातेवाईकांचीही व्यवस्था
या शिबिरात पाय रोपण करण्यात आले एवढेच नव्हे तर रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांची ही जेवण व निवासाची सोय देखील मोफत करण्यात आली,अपंग व्यक्तिनि कोनावरही अवलंबून न राहता आपल्या दिनचर्यासह स्वतःच्या पायावर उभे करावयासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात बसविण्यात आलेल्या कृत्रिम पायाने रूग्णाला चालता फिरता येते व उभे राहता येते यासह सायकल चालवणेे शक्य होणार आहे. शिबिरात पाय बसविण्यात आलेल्या रुग्णांच्या चेहर्‍यावर आनंद बघुन समाधान लाभण्याची प्रतिक्रिया ग्रुप च्या सर्व सदस्यानी व्यक्त केली

अथक परिश्रम घेतले
गुजरात राज्यातील सुरत येथील मानवसेवा समितीच्या सेवाभावी उपक्रमास शहादा येथील सामाजिक जाणिवा ठेवून कार्यरत असणार्‍या संकल्प गृप यांनी संयुक्त विद्यमाने गेल्या 45 दिवसांपासून जयपूर फुट रोपणबाबत जनजागृती केली होती.

हे देखील वाचा

मोहिनीच्या स्वप्नातील घर साकारले शताब्दी महोत्सवाने

आज मोहिनीसह परीवाराचा ’शताब्दी हाउस’मध्ये गृहप्रवेश फैजपूर (नीलेश पाटील):- ’जिसका कोई नही उसका खुदा होता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *