Sunday , March 18 2018

44 निर्यात सुविधा केंद्र उभारणार

पुणे । राज्यातून फळे व भाजीपाला निर्यातीत वाढ होण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकष पूर्तता करणार्‍या पायाभूत सुविधांची कमतरता होती. केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने राज्यात कृषी पणन मंडळामार्फत 44 निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 21 निर्यात सुविधा केंद्र, 20 आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्र आणि 3 फुले निर्यात सुविधा केंद्र अशी एकूण 44 सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत.

2761 मेट्रीक टन शेतमाल परदेशात
या सुविधांचा जास्तीत जास्त वापर होऊन तेथून निर्यात व देशांतर्गत बाजारात शेतमाल जावा, तसेच रोजगार निर्मिती व्हावी, याबाबत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सूचना दिल्या आहेत. या केंद्रांवरून निर्यात होणार्‍या कृषी मालामध्ये द्राक्ष, गुलाब, फुले, डाळींब, मसाले पदार्थ, पशुखाद्य, आंबा पल्प व इतर फळे व भाजीपाला यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पणन मंडळाच्या सुविधा केंद्रांवरून 26 कोटी 55 लाख 34 हजार रुपयांचा 2761 मेट्रीक टन शेतमाल जर्मनी, नेदरलॅण्ड, थायलंड, बहरिन, अमेरिका व युरोपियन देशांमध्ये निर्यात झाला आहे. सुविधा केंद्रांवरून देशांतर्गत विक्रीसाठी मालाचीही हाताळणी केली जाते. यामध्ये कांदा, बटाटा, केळी, संत्रा, मोसंबी, लिंबू, गुलाब, फुले या शेतमालाचा समावेश आहे.

796 मेट्रीक टन शेतमाल शहरांमध्ये
गेल्या तीन महिन्यांत विक्रीसाठी 1 कोटी 88 लाख किमतीचा 796 मेट्रीक टन शेतमाल मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर आदी शहरांमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, सुनील पवार म्हणाले की, सुविधा केंद्रांमुळे कुशल व अकुशल रोजगार निर्मिती होऊन गेल्या तीन महिन्यांत सुविधा केंद्रांवर 412 कुशल व 1505 अकुशल असे एकूण 1917 जणांना रोजगार मिळाला आहे. सन 2018 मधील आंबा हंगाम आता सुरू झाला असून हा हंगामात कृषी पणन मंडळाच्या सुविधा केंद्रांवरून 1 हजार मेट्रिक टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हे देखील वाचा

आकर्षक शोभायात्रांनी गुढीपाडवा सजला

ढोलताशांचा दणदणाट, लेझीमचं शिस्तबद्ध संचलन, पारंपारिक पोशाखात नटलेल्या मंडळींचा सहभाग घराघरांवर उभारल्या गुढ्या : वाहनांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *