46 लाखांचे खंडणी प्रकरण : तिघा संशयीतांना जामीन मंजूर

0

भुसावळ : नागपूर येथील प्लॉट विक्रीच्या कारणावरुन शहरातील एकास 46 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत शनिवारी रात्री नगरसेविका मंगला आवटे यांचे पती संजय आवटे यांच्यासह अन्य तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी भुर्‍या बारसे (रा.वाल्मिकी नगर, भुसावळ), किशोर उर्फ सुधाकर टोके (रा.गांधीनगर, संजय आवटे यांचे गाडीवरील चालक) व अनिल किशोर डागोर (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी कोठडी संपल्यानंतर आरोपींना न्या.मानकर यांच्या न्यायासनापुढे हजर केल्यानंतर त्यांची आधी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली व नंतर जामिनासाठी अर्ज केल्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपींची 15 हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. आरोपींतर्फे अ‍ॅड.चरणजित सिंग व अ‍ॅड.मनीष सेवलानी यांनी काम पाहिले.