82 वर्षानंतर हद्दवाढीचा दिलासा ; पालिका सर्व सुविधा पुरवणार

0

दारा मोहम्मद ; हद्दवाढीचे श्रेय कुणीही लाटू नये, दोन वेळा केला पाठपुरावा

रावेर- सुमारे 82 वर्षानंतर रावेर नगरपालिकेची हद्दवाढ झाली असून शासनाकडून मिळालेल्या गाईड लाईन्सनुसार पालिका हद्दीबाहेरील वसाहतींना सुविधा पुरवल्या जातील, या संदर्भात लवकरच आम्ही डीपीआर तयार करून प्रशासनाकडे सुपूर्द करणार आहोत. यामध्ये पाणी, वीज, रस्ते स्वच्छतेवर जास्त भर देण्यात येणार असून पालिका हद्दवाढीचे श्रेय कुणीही घेऊ नये, दोन वेळा वेळा आपण नगराध्यक्ष असताना शासनाकडे ठोस पाठपुरावा केल्याचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी बुधवारी पत्रकार परीषदेत सांगितले.

माजी मंत्र्यांसह खासदारांचे आभार
नगरपालिकेच्या हॉलमध्ये नगरपरीषदेतर्फे हद्दवाढीची माहिती जनतेला देण्यासाठी पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष यांनी हद्दवाढीला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करणार्‍या माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे तर आमदार हरीभाऊ जावळे यांचे खास आभार मानले तर पाठपुरावा करणार्‍या मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचेदेखील अभिनंदन केले. यावेळी पालिका हद्दी बाहेरील सुमारे 27 वसाहतींचा यात समावेश करण्यात आला असून 4.85 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आता नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाले आहे. सुमारे 40 हजार लोकसंख्या पालिकेची जनता पुढचा 2021 चा कारभारी निवडणार असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी अ‍ॅड.सुरज चौधरी, आसीफ मोहोम्मद यांनी देखील हद्दी बाहेरील वसाहतीची माहिती दिली. पत्रकार परीषदेला सादीक मेंबर, असलउल्ला खान, सुधीर पाटील, अ‍ॅड.योगेश गजरे, शेख कलीम, जगदीश घेटे, अय्यूबखा पठण यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

वाढीव हद्दवाढीत या गटांचा समावेश
उत्तर दिशा- गट क्रमांक 1 , 2 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 13 , 14 , 15 , 16 , 33 , 34 , 36 , 37 , 38 , 39 , 1796 तसेच पूर्वेकडील भागात 530 , 531 , 532 , 533 , 535 , 536 , 537 , 538 , 540 , 543 , 612 , 327 , 694 ,तसेच पश्चिमेकडील भागात गट क्रमांक 701 , 704 , 705 , 706 , 707 , 709 , 710 , 97 11 ( 1 ) , 711 ( 2 ) , 711 (3) , 712 , 730 , (731 , 733 , 734 , 736 , 737 , 738 , 9039 , 740 , 741 , 742 , 745 , 747 , 748 , 750 , 9051 , 752 , 753 , 754 , 7555 , 756 , 7597 , (760 , 761 , 762 , 9763 , 765 , 9766 , 195 , 1140 , 1141 , 1142 , 1143 , 1144 , 1145 , 1146 , 1147 , 1148 , 1149 , 1150, 1151 , 1152 , 1155 , 1156 , 11596 , 1158 , 1159 , 1160 , 1161 , 1162 , 11871 , 1172 , 1173 , 1175 , 1177 , 1256 , 1258 , 1259 , 1262 ( 1 ) 1262 ( 2 ) 126 3 , 1264 , 1266 , 1267 , 1270 , 1201 , 1272 , 1273 , 1274 , 1276 , 1278 , 12909 , 1281 , 1282 तसेच दक्षिणेकडील भागातील गट क्रमांक 14 , 15 , 16 , 17 , 18 , 19 , 20 , 21 , 22 , 23 , 24 , 25 , 26 , 27 , 29 , 30 , 31 , 33 , 34 , 35 , 37 , 38 , 39 , 49 , 50 , 51 , , 52 , 53 , 54 , 55 , 56 , 68 , 69 , 71 , 72 , 73 , 74 , 78 , 79 , 80 , 82 , 84 , 89 चा समावेश करण्यात आला आहे.