आसोद्याला तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

0

तरुणी खूनातील मयत मुकेश सपकाळेची आतेबहिण ; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

जळगाव : तालुक्यातील आसोदा येथील धनश्री संजय सपकाळे वय 19 या तरुणीने राहत्या घरात गळफास घेत अत्महत्या केल्याची घटना 1 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. धनश्री ही एका दिवसांपूर्वी खून झालेल्या मयत मुकेश सपकाळे यांची चुलत आतेबहिण असल्याची माहिती मिळाली असून तिच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली, संजय भगवान सपकाळे हे आसोदा येथील भोळे नगरात पत्नी रजुबाई, मुलगा आकाश व मुलगी धनश्री यांच्यासह वास्तव्यास आहे. गावातील नातेवाईक मुकेश सपकाळे याचा मृत्यू झाल्याने याठिकाणी सर्व कुटुंबिय गेले होते. घरी धनश्री एकटीच होती.

चुलत भावामुळे आत्महत्येचा प्रकार उघड
संजय सपकाळे यांच्या घराशेजारीच त्यांचे भाऊ राहतात. धनश्री हिने काकांचा मुलगा हर्षल याला जेवन वाढून दिले. जेवणानंतर हर्षलचे जेवण आटोपल्यानंतर तो पाणी पिण्यासाठी बाजुच्या खोलीत गेला असता धनश्री ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तत्काळ नातेवाईकांना माहिती दिली. मागच्या बाजूने दरवाजा उघडून तिचा मृतदेह उतरविण्यात आला. प्रथम धनश्रीला खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी धनश्रीला मृत घोषीत केले. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. येथेही डॉक्टरांनी धनश्रीला मृत घोषीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. मयत धनश्री ही नुकतीच 12 वी परिक्षेत 89 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली होती. तसेच शिवणक्लासही लावला होता. सर्व सुरळीत असताना तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले हे कळू शकलेले नाही.