पोखरण रेंजमध्ये हवाईदलाचा ‘वायू शक्ती अभ्यास’

0 2

पोखरण । पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतीय जनतेचा तासागणिक केंद्र सरकारवर दबाव वाढत आहे, तर दुसरीकडे राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारतीय वायू सेना शनिवारी आपली ‘शक्ती’ अजमावणार आहे. हा सराव एका अभ्यासाचा भाग असून, यात अत्याधुनिक विमानांचा समावेश असणार आहे.

भारतीय वायू सेनेने आपल्या ट्वीटर हँडलवरून या अभ्यासाची माहिती दिली आहे. ‘वायू शक्ति अभ्यास 2019’, असे त्याला नाव देण्यात आले असून, तो पूर्वनियोजित आहे. मात्र, त्याला आता पुलवामा हल्ल्याची पार्श्‍वभूमी लाभली आहे. भारतीय हवाईदल कोणत्याही स्थितीत धडाकेबाज काम कसे करू शकते? याचे प्रदर्शन या अभ्यासात केले जाणार आहे.

भारतीय वायू दलाच्या शक्ती अभ्यासाचे थेट प्रक्षेपण दुपारी पावणेपाच वाजेपासून नागरिकांना पाहता येणार आहे.

http://webcast.gov.in/iaf/