चाळीसगाव- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांनी आज चाळीसगाव दौरा करून जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निकालासह आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणूकीची चाचपणी केली. त्यांनी शहरातील भाजपाच्या माजी आमदारांसह लोकप्रतिनीधींची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार हे आज चाळीसगाव दौर्यावर होते. पवारांचा दौरा अचानक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आज सकाळी अजित पवार हे माजी आ. राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी उतरले. त्यानंतर त्यांनी माजी आमदार साहेबराव घोडे यांच्यासह बेलगंगा कारखान्याचे संचालक चित्रसेन पाटील, प्रदीप देशमुख यांच्यासह शहरातील लोकप्रतिनीधींची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची चाचपणी देखिल केल्याचे समजते. दरम्यान आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणूकीबाबतही त्यांनी पदाधिकार्यांशी चर्चा करून राजकीय परिस्थीतीचा अंदाज घेतला.