आज वाढदिवसालाच अलिबाबाचे मालक जॅक मा निवृत्त !

0 1

बीजिंग: चीनमधील ऑनलाईन जगतातील नावाजलेली कंपनी अलिबाबाचे मालक उद्योजक जॅक मा यांचा आज १० सप्टेंबर वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी निवृत्तीची घोषणा केली असल्याने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जॅक मा यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. एक शिक्षक ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असा त्यांचा प्रवास आश्चर्यचकित करणारच आहे. जॅक मा यांच्या नंतर आता त्यांच्या कंपनीच एकरभर डेनियल झांग हे पाहणार आहे. जॅक मा यांच्यानंतर आता कंपनीचा कशी प्रगती करते ही देखील येणाऱ्या दिवसात कळणार आहे.