अमळनेरात कोम्बिंग ऑपरेशन

0
अमळनेर (प्रतिनिधी) :- अमळनेर शहरात काही दिवसांत दोन खून आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर अमळनेर शहरात दहशतीचे वातावरण आहे. त्यासाठी अमळनेर शहर 10 वाजता बंद करण्यात आले आणि शहरातील गांधलीपुरा, झामी चौक,बॉम्बे गल्ली, शहरातील ठिकठिकाणी हे रात्रभर ऑपरेशन सुरू होते. क्राईम रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांच्या घराची झडती घेण्यात आली. गुन्हेगारांकडे असलेली घातक शस्त्रे पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. यापूर्वी पकडण्यात आलेले सर्व आरोपी फरार आहेत का नाही याची खातरजमा व शस्त्रे वगैरे काही आहेत का ? या किलरचा शोध घेण्यासाठी पोलीस खात्यातील डीवायएसपी शेख यांच्या मार्गदर्शनाने दोन अधिकारी व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी 31 पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली आहे. हत्येचा सूत्रधार किंवा हत्या करणारा मास्टरमाइंड अद्यापही पोलिसांना चकवा देत आहे. दरम्यान या दोन्ही हत्येबाबत पोलिसांनी व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या मुख्य संशयित राज वसंत चव्हाण यांच्याकडे मोर्चा वळविला असून सध्या गुन्हेगारांमधील व्यसनाधीनता अथवा त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रे या कारणास्तव हे हत्याकांड घडले असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येते. शहरातील गुन्हेगारांच्या वास्तव्याच्या भागात कोम्बिंग ऑपरेशन केले. गुन्हेगारांवर स्थानिक पोलिसांचा वचक नसल्याने उच्च पोलिस अधिकारी यांनी कोम्बिंग ऑपरेशनचा आदेश दिला. पोलिस अधिकारी, कर्मचारी व दंगा नियंत्रण(ठउझ) पथकाच्या कर्मचार्‍यांनी वेश्याव्यवसाय भागात व गुन्हेगारांच्या घरात हे ऑपरेशन राबविले.