Tuesday , October 23 2018
Breaking News

अग्रलेख

दसरा सण मोठा, नाही राजकारणाला तोटा!

दसरा हा एकच सण असला तरी या सणाच्या दिवशी विविध प्रथा पाळल्या जातात. या दिवशी सोनं लुटतात, शाळेत पाटीपूजन केलं जातं, शस्त्रांची पूजा केली जाते, रावणाच्या प्रतिकृतीचं दहन केलं जातं. त्यामुळे वैविध्यपूर्ण सण अतिशय आनंदाने साजरा केला जातो. ही प्रत्येक प्रथा आपल्याला काही शिकवण देत असते. कोणताही सण साजरा करताना …

अधिक वाचा

मोदी आता तरी बोला!

साडेचार वर्षांपूर्वी मोठ्या वाजत-गाजत सत्तेवर आलेल्या आणि आता 2025 पर्यंत सत्तेवर आम्हीच असू अशी दर्पोक्ती करणारा भाजप 2019 पूर्वीच गळपटला आहे. आजवरचे निर्णय, जाहिर केलेल्या योजना, दिलेली आश्‍वासने यात हा पक्ष पूर्ण फसला आहे. तसेच पूर्वी विरोधकांवर सोडलेले आरोपांचे बाण त्यांच्यावरच उलटले आहेत. 57 इंच छातीचे भाषा करणारे पंतप्रधान अजूनही …

अधिक वाचा

# मी टू ! भरकटायला नको

लैंगिक शोषणाविरोधात ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आवाज उठवण्यासाठी जगभरात सध्या #मी टू कॅम्पेन म्हणजेच मी सुद्धा अभियान सुरु आहे. हॉलिवूड अभिनेत्री अलिसा मिलानोने सुरु केलेल्या या अभियानाअंतर्गत जगभरातील महिला त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटना सांगत आहेत…आता हे वादळ भारतातही पसरले आहे. याच्या तडाख्यात केवळ चित्रपटसृष्टीतील नव्हे तर विविध …

अधिक वाचा

शिवसेनेसोबतचे मनधरणी तंत्र!

2014 ला लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाचे वर्तनच बदलले. केवळ नेत्यांकडे असणारा अहं भाव साध्या कार्यकर्त्यांपर्यंत झिरपला. सगळीकडेच ताठरता. सरकार स्थापनेनंतर घटक पक्षांना काडीचीही किंमत उरली नाही. स्वातंत्र्यपूर्व चळवळीत ब्रिटिशांविरोधात चले जावो जसा नारा होता, त्याचपद्धतीने इतर पक्षांना अशी धमकावणी सुरू झाली. महाराष्ट्रात मात्र शिवसेना पुरून …

अधिक वाचा

शरद पवारांची तिसरी पिढी…

शरद पवार! महाराष्ट्र आडवा-उभा माहित असलेले एकमेव नाव. देशाच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. कामाचा अफाट आवाका, अचुक वेळ साधून सूचक विधान करण्याची कला, अजातशत्रू, राजकारणाच्या पलिकडे जावून नाती जपणारा माणूस. त्यामुळेच एखादी साधी बैठक असो, की दिल्लीतील केवळ फेरफटका हा चर्चेचा विषय ठरतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ते केंद्रस्थानीच असतात…आता 2019 …

अधिक वाचा

हे सरकार नेमके आहे कोणाचे?

मोहनदास करमचंद गांधी! सार्‍या जगाला अहिंसा हा मंत्र देणारा महात्मा. त्यांचीच 150 वी जयंती सर्वत्र साजरी झाली. मात्र, त्यांच्या विचारांचा व्देष्टा असणारे सरकार या देशात सत्तेवर आहे. याची झलक महात्मांच्या जयंतीदिनीच दाखवत या देशाचा पोशिंदा असणार्‍या बळीराजाला दिल्लीत बुकलून काढले. त्यांच्या अंगावर लाठ्या चालविल्या, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे प्रचंड फवारे …

अधिक वाचा

शिवसेनेच्या बुडाखाली जाळ की ऊब?

आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र आहे, नाहीतर तो कधीच गुजर, मारवाड्यांचा झाला असता. आम्ही आहोत म्हणून इथं मराठी माणूस शिल्लक आहे, नाहीतर त्याला या व्यापार्‍यांनी कधीच पळवून लावलं असतं. आम्ही आहोत म्हणून इथं शांतता आहे, नाहीतर हा बिहार झाला असता. प्रत्येक मराठी माणूस, आमचा आहे आणि त्याच्यातील सळसळतं रक्त, हे आमचं …

अधिक वाचा

हे राम!

उठता, बसता बौद्धिकतेचे धडे देणार्‍या, तिन्ही काळ बोधामृत पाजणार्‍या आणि स्वच्छ आचार-विचाराचे स्वत:लाच प्रशस्तीपत्र देणार्‍या भाजपाचा खरा चेहरा किती भयावह आहे याचे दर्शन आता जनतेला होत आहे. जिल्हा पातळीवरील पुढार्‍यापासून पक्षाच्या अध्यक्षांपर्यंत एका माळेचे मणी आहेत. या माळेत आणखी एक मणी वाढला आहे आणि तो म्हणजे राम कदम! हा गृहस्थ …

अधिक वाचा

महाराष्ट्रातील वाहनधारक श्रीमंत?

आर्थिक मंदी आणि जीएसटीमुळे सरकारचे उत्पन्न घटलेले असताना केवळ पेट्रोल-डिझेलच्रा विक्रीतून मिळणार्‍रा करावरच राज्र सरकार सध्रा महाराष्ट्राचा गाडा हाकते आहे. देशात सर्वाधिक महाग दराने पेट्रोल-डिझेलची विक्री कुठे होते तर ती महाराष्ट्रात. राज्रातल्रा ग्राहकांना दर लिटर पेट्रोल-डिझेलच्रा खरेदीवर तब्बल 48.8 टक्के कर आणि पेट्रोलवर 9 रुपरे अतिरिक्त सेसचा भुर्दंड सहन करावा …

अधिक वाचा

केरळमधून महाराष्ट्राने बोध घ्यावा !

केरळच्या महाप्रलयामध्ये आतापर्यंत जवळपास 357 जणांचा बळी गेला. दहा लाख 78 हजार नागरिक बेघर झाले  आहेत. राज्यातील 40 हजार हेक्टर पिकांची नासधूस झाली, तर 26 हजार घरे जमीनदोस्त झाली आहे. राज्यातील एक लाख किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत, तर 134 पूल खराब झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. केरळमध्ये येणार्‍या पर्यटकांनी …

अधिक वाचा
error: Content is protected !!