आसूसने गेमिंग सीरिजची नवीन श्रेणी भारतात दाखल केली

0

‘एफएक्स ५०४ टीयूएफ गेमिंग’ आणि ‘आरओजी जी ७०३’ लॅपटॉपचा समावेश

मुंबई : आसूस इंडियाने गेमिंग सीरीजच्या वैविध्यपूर्णतेवर भर देत ‘एफएक्स ५०४ टीयूएफ गेमिंग’ आणि ‘आरओजी जी ७०३’ ही दोन शक्तिशाली उप्तादने भारतीय बाजारात सादर केली. ‘एफएक्स ५०४’ हा नवीन टीयूएफ गेमिंगमधील पहिला लॅपटॉप असेल ज्यात ८व्या जेन प्रोसेसरचा समावेश आहे. ‘आरओजी जी७०३’ला नवीन हेक्झा कोअर इंटेल आय९ प्रोसेसर असून त्यातही ८व्या जेन प्रोसेसरचा समावेश आहे. या नवीन उत्पादनांमधून अतुलनीय दमदार कामगिरी आणि विश्वासार्हता दिली जाते आणि त्यामुळे ग्राहकाला अत्यंत सहजपणे अनेक कामे एकाच वेळी करता येतात.

आरओजी जी७०३ हा अशा लोकांसाठी आहे ज्यांना सर्वांत शक्तिशाली गेमिंग नोटबुकची आवश्यकता आहे. यातील इंटेल कोअर आय९-८९५०एचके प्रोसेसरचा वेग सुमारे ४.८ गिगाहर्टझपर्यंत वाढतो जो त्याच्या मूलभूत वेगाच्या ११ टक्के अधिक आहे. त्याला एनव्हीआयडीआयए जीफोर्स जीटीएक्स १०८० ग्राफिक्स आणि ८ जीबी जीडीडीआर५एक्स व्हीरॅमने १९७४ मेगाहर्टझ आणि १०.३ गिगाहर्टझने ऊर्जा मिळाली आहे. आरओजी जी७०३ मध्ये एक १७.३ इंची एफएचडी आयपीएस डिस्प्ले असून त्यात १४४ हर्टझचा उच्च रिफ्रेश रेट आहे. यात हायपरड्राइव्ह एक्स्ट्रीम स्टोअरेज असून ते एक असे खास तंत्रज्ञान आहे जे सुमारे तीन एनव्हीएमईपीसीएलई ३.० x एसएसडी एकत्र आणते आणि जी७०३ ला जगातील सर्वाधिक वेगवान रेड ० स्टोअरेज कॉन्फिगरेशन देते. आरओजी जी ७०३ मधून ऑरा सिंक तंत्रज्ञानाला सहकार्य केले जाते. त्यामुळे गेमर्सना ऑरा सिंक सपोर्टेड गेमिंग माइसने लाइफ इफेक्ट्स मिळतात तसेच हेडसेट्स आणि इतर उत्पादनांसोबत उत्तम लुक आणि फील यांच्यासोबत एक चांगला गेमिंग सेटअप मिळतो. याची किंमत ४,९९,९९० रुपये आहे.

एफएक्स५०४ ला अद्ययावत ८व्या पिढीच्या इंटेल कोअर आय७-८७५०एच प्रोसेसरने ऊर्जा मिळाली असून त्यात एनव्हायडीआयए जीफोर्स जीटीएक्स १०५० टीआय ग्राफिक्स फुल मायक्रोसॉफ्ट डायरेक्ट १२ सपोर्ट आहे. ते एका सडपातळ २.५ सेमी चेसिसमध्ये येत असून त्याचे वजन अवघे २.३ किलो आहे आणि त्यामुळे तो पोर्टेबल गेमिंग लॅपटॉप ठरला आहे. त्याचबरोबर त्यात एक ८जीबी रॅम, १टीबी फायरक्युडा एसएसएचडी आणि १२८ जीबी पीसीआई एसएसडीदेखील आहे जे ऑन दि गो मल्टिटास्किंग, मनोरंजन आणि गेमिंगसाठी उत्तम आहे. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे त्यातील हायपरकूल तंत्रज्ञान आहे. एफएक्स ५०४ चे थर्मल डिझाइन त्याचे जीवनमान वाढवते आणि गेमिंग मॅरेथॉन सुरू असताना तुम्हाला स्थिर कूलिंग देते. एफएक्स ५०४ मध्ये एक १५ इंची एफएचडी आयपीएस डिस्प्ले असून त्यासोबत अल्ट्राफास्ट १२० हर्टझ रिफ्रेश रेट आणि ३ मीटर ग्रे टू ग्रे (जीटीजी) रिस्पॉन्स कालावधी त्याच्या १३० टक्के एसआरबी कलर गॅमट आणि वाइड व्ह्यू अँगलसोबत येतो. याची किंमत ८९,९९० रुपये आहे.

आसूस इंडियाचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अर्नोल्ड सू म्हणाले, “टीयूएफ गेमिंग आणि अद्ययावत आय९ प्रोसेसरसारख्या उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान आमच्या नवीन ९व्या जनरेशनच्या एडिशन्समध्ये आणताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. गेमिंग लॅपटॉपच्या अद्ययावत श्रेणीतून उत्तम कामगिरी आणि टिकाऊपणा मिळत असून त्यामुळे ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण होते. आमचे उद्दिष्ट गेमर्सना दोन्ही जगांमधील सर्वोत्तम गोष्टी देऊन त्यांना आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी उद्युक्त करण्याचे आहे.”