विवाहात अनावश्यक खर्च टाळा

0

खर्च टाळून उर्वरित रक्कम सतकर्मासाठी वापर करा- कुटुंब नायक रमेश विठू पाटील

भुसावळ: मुला-मुलींना त्यांच्या संसारात स्वातंत्र्य देणे गरजेचे असून अनावश्यक हस्तक्षेप टाळल्यास संसार सुखाचा होतो व विवाहात होणार्‍या वायफळ खर्चाला फाटा देवून या पैशांचा सत्कर्मासाठी वापर करावा, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबप्रमुख रमेश विठू पाटील यांनी येथे केले. लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परीचय मेळावा शनिवारी सकाळी 11 वाजता शहरातील संतोषी माता सभागृहात झाला. प्रसंगी कुटुंबनायक बोलत होते. प्रसंगी 900 इच्छूक वधू-वरांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली मात्र अवघ्या 35 उपवर-वधूंनी मेळाव्यात परीचय दिला. मान्यवरांच्या हस्ते वधू-वर परीचय सूचीचे प्रकाशन करण्यात आले.

तर संसार होईल सुखाचा

मेळाव्याप्रसंगी कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी मार्गदर्शनात मुला-मुलींचा संसार सुखाचा होण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य देणे गरजेचे असल्याचे सांगत आवश्यक तेथेच सकारात्मक पद्धत्तीने हस्तक्षेप करावा, असे सांगत विवाहात होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचे आवाहन केले.

विचार मंचावर यांची उपस्थिती

विचार मंचावर कुटुंबनायक रमेश विठू पाटील, लेवा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, माजी आमदार नीळकंठ फालक, औरंगाबाद येथील मधुकर सरोदे, सुहास गोपाळ चौधरी, आर.जी.चौधरी, अजय भोळे, परीक्षीत बर्‍हाटे, राजेश सुधाकर चौधरी, आरती चौधरी, मंगला पाटील, शामल झांबरे, दीपाली बर्‍हाटे आदींची उपस्थिती होती.

यांनी घेतले परिश्रम

प्रास्ताविक अ‍ॅड.प्रकाश पाटील तर सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी व आभार देवा वाणी यानी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी देवा वाणी, डॉ.बाळू पाटील, श्याम भारंबे, रूपेश चौधरी, गिरीश चौधरी, विनय चौधरी, शुभम पाटील, निरज किरंगे, अमोल महाजन, रोहन भोळे, सचिन वाणी, कोमल चौधरी, चेतन अंबोले, निलेश राणे आदींनी
परिश्रम घेतले.