‘भुसावळ टायगर्स’चा बहरीनमध्ये डंका

0 1

हॉकी सामन्यात पटकावले जेतेपद

जळगाव । भुसावळच्या हॉकीपटूंनी बहरीनमध्ये झालेल्या द इंडियन क्लब सिरिल मॅक मेमोरियल इंटरनॅशनल सहाव्या हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कुवैतच्या संघाचा 2-0 गुणांनी पराभव केला. या शानदार विजयामुळे स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदावर ‘भुसावळ टायगर्स’चे नाव कोरले गेले आहे.

विजेत्या भुसावळ टायगर्स संघात रेयाझ कुरेशी, आरिफ कुरेशी, अकबर खान, मोहसीन कुरेशी, शेहबाज खान, तबीश कुरेशी, साहील पटेल, अर्शद खान, अली खान यांचा समावेश आहे. स्पर्धेत डॉन बॉस्को (कुवैत), सौदी लिजंड, भुसावळ टायगर्स, नकी स्ट्राईकर्स यांच्यासह 10 संघांचा सहभाग होता. त्यांच्यात क्वार्टर फायनल, सेमी फायनल व ग्रँड फायनल या फेर्‍यांमध्ये लढत झाली. भुसावळ टायर्गसने 3-0 गुणांनी सौदीच्या संघाच्या पराभव केला. यानंतर अंतिम सामन्यात भुसावळची लढत कुवैतच्या संघाशी झाली. यात भुसावळच्या हॉकीपटूंनी 2-0 गुणांनी प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले, अशी माहिती अझहर शेख यांनी दिली. दरम्यान, या विजयाबद्दल भुसावळच्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.