BIG BREAKING: अखेर कॉंग्रेसच्या समर्थनाचे पत्र फॅक्सद्वारे शिवसेनेला प्राप्त !

0

मुंबई: अखेर राज्यातील सत्ता संघर्ष संपण्याचे चिन्ह आहे. कारण शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने पाठींबा दिला आहे. कॉंग्रेस शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत अनुकूल नव्हती, मात्र आता कॉंग्रेसने देखील पाठींबा दिला असून समर्थनाचे पत्र फॅक्सद्वारे शिवसेनेला देण्यात आले आहे. हे पत्र घेऊन शिवसेना राज्यपालांच्या भेटीला गेले असून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. ४४ आमदारांचे पत्र फॅक्सद्वारे देण्यात आले आहे.

शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल असताना कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अनुकूल नव्हते. शेवटी कॉंग्रेसने देखील बाहेरून पाठींबा दिला आहे.