नोटबंदीला तीनवर्ष: ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला भाजप सरकार जबाबदार: राष्ट्रवादी

0

मुंबई: मोदी सरकारने तीन वर्षापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने संपूर्ण देश हादरून निघाले होते. या निर्णयाचे अनेक परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाले होते. आज नोटबंदीला तीनवर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोदी सरकारवर आरोप केले आहे. नोटबंदीच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनंतरही देश या निर्णयाचे परिणाम भोगतो आहे. देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था, मंदी आणि लाखो लोकांना बेरोजगार करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे असे आरोप राष्ट्रवादीने केले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक हजार आणि ५०० रुपयाच्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला होता. याकाळात अनेक लोकांचे बँकासमोर रांगेत असताना मृत्यू झाला होता. यावरून राष्ट्रवादीने पुन्हा भाजप सरकारला लक्ष केले आहे.