जळगाव – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपा महिला आघाडीतर्फे आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आकाशवाणी चौकात महिला आंदोलनासाठी जमल्या तेव्हा या महिला पदाधिकार्यांना पोलीसांनी धक्काबुक्की करून गाडीत कोंबत राठोडांविरोधातील आंदोलन पोलिसांनी दडपल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान आंदोलनच झाले नाही तर मग गुन्हा कसा? संजय राठोडांवर गुन्हा दाखल का होत नाही? असे प्रश्न भाजपाच्या महिला पदाधिकार्यांनी उपस्थित केले.
हे देखील वाचा