BREAKING: अखेर इंदुरीकरांनी ‘त्या’ वक्तव्यावरून व्यक्त केली दिलगिरी !

0

मुंबई: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सम-विषम तिथीला स्त्रीसंग ठेवल्यास मुलगा-मुलगी होत असल्याचे विधान केल्याबद्दल ते वादात सापडले होते. सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका झाली. मोठे समर्थनही त्यांना मिळाले. मात्र हा वाद वाढत चालल्याने अखेर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. स्वत:च्या हस्ताक्षरात इंदुरीकर यांनी पत्र काढले असून त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून कोणाच्या भावना दुखविल्या गेल्या असेल तर दिलगिरी व्यक्त केली आहे. महिला वर्गाला उद्देशून इंदुरीकर यांनी पत्रक काढले आहे. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

इंदुरीकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्या तृप्ती देसाई ह्या मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आजपर्यंत इंदुरीकर यांनी शिक्षक यांच्यासह इतर समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी सर्वांची माफी मागावी असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले.