BREAKING: अखेर इंदुरीकर महाराजांनी नोटीसीला दिले उत्तर; केला खुलासा !

0

अहमदनगर: सम-विषय तिथीला स्त्री संग झाल्यास मुलगा-मुलगी होतो असे वक्तव्य प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले होते. त्यावरून ते प्रचंड अडचणीत सापडले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. मात्र त्यांनी जाहीर पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे खुलासा करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. आज खुलासा देण्याची अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवशी इंदुरीकर यांनी नोटीसीला उत्तर देत खुलासा केला आहे. इंदुरीकर यांचेवकील शिवडीकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे जाऊन खुलासा सादर केलेला आहे.

काल इंदुरीकर यांनी त्यांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असे पत्र लिहून जाहीर केले होते. मात्र तरीही त्यांच्यामागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आज बुधवारी त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे आपल्या वक्तव्याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. शेवटच्या क्षणी त्यांनी खुलासा सादर केला आहे.