BREAKING: आठवड्याभरासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद; मोदी सरकारचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली: जगभरात हैदोस माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. भारतामध्ये आढळलेल्या रुग्ण संख्येत सर्वाधिक रुग्ण हे बाहेर देशातून आलेले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात सर्व आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे.

१० वर्षाखालील मुलांनी तसेच ६५ वर्षावरील वृद्धांनी बाहेर पडू नये असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.