BREAKING: झारखंडमध्ये भाजपला दणका ; कॉंग्रेस आघाडी बहुमताच्याजवळ !

0

रांची: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्यानंतर आता झारखंडमध्येही भाजपला धक्का बसला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी होत आहे.निकाल समोर येऊ लागले आहे. मतमोजणीत सुरुवातीपासून कॉंग्रेस आघाडीने आघाडी घेतली आहे. ती अजूनही कायम आहे. कॉंग्रेस आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचली असून भाजपला जोरदार धक्का बसला आहे. झारखंडमध्ये भाजप सत्तेत आहे मात्र या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसताना दिसत आहे. कॉंग्रेस आघाडीने जवळपास सत्ता संपादन केल्याचे दिसून येते.

कॉंग्रेस आघाडीने तब्बल ४२ जागांवर विजय संपादन केले आहे. सत्ताधारी भाजपला २८ जागांवर विजय मिळताना दिसत आहे. कॉंग्रेसला ११ तर जेएमएमला २६ जागांवर विजय जवळपास निश्चित झाले आहे. ८१ जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली.