BREAKING: देवेंद्र फडणवीस शिवतीर्थ मैदानावर दाखल; बाळासाहेबांना अभिवादन !

0

मुंबई: आज दिवंगत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांना शिवतीर्थ मैदानावर सर्व पक्षीय नेत्यांनी आदरंजली वाहिली आहे. सर्वपक्षीय नेते याठिकाणी आले असताना भाजप नेते आलेले नव्हते, त्यामुळे चर्चा सुरु होती. दरम्यान आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याठिकाणी दाखल झाले आहे. त्यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली. फडणवीस आले असताना उद्धव ठाकरे मात्र तेथे उपस्थित नव्हते.

युतीत बिघाड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस शिवतीर्थ मैदानावर येतील की नाही?याबाबत चर्चा सुरु होती. मात्र त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाले आहे.

काही वेळापूर्वी भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडे हे शिवतीर्थ मैदानावर दाखल झाले आहे होते. तावडे, मुंडे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. सकाळपासून शिवतीर्थ मैदानावर गर्दी आहे. सर्व पक्षीय नेते याठिकाणी आले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी आदरांजली वाहिली होती. त्यानंतर आता भाजप नेते देखील याठिकाणी आले आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाजप नेते शिवतीर्थ मैदानावर येतील का? याबाबत चर्चा होती, अखेर ते आले आहेत.