पर्यटनासाठी इटलीहून आलेले १५ जण कोरोना बाधित

0

नवी दिल्ली: चीनसह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव आता भारतातही होऊ लागला आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. दरम्यान पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जण कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २१ जणांची तपासणी करण्यात आली असता त्यापैकी १५ जणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत ठेवण्यात आले आहे.