BREAKING: भाजपचे सर्व खासदार, आमदार एका महिन्याचे वेतन देणार कोरोनासाठी

0

नवी दिल्ली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात 21 दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. यासाठी सरकारकडून मोठ्या निधीची घोषणा देखील करण्यात आली आहे, दरम्यान आता भाजपचे सर्व खासदार आमदार एका महिन्याचे वेतन कोरोनासाठी देणार आहेत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज याची घोषणा केली. भाजपचे सर्व आमदार एक कोटींचा स्थानिक निधी देखील यासाठी देणार आहेत असेही जे.पी.नड्डा यांनी सांगितले.