ADVERTISEMENT
नवी दिल्ली: आज जगभरात ईद साजरी केली जात आहे. शांतता आणि सलोख्यासाठी ईद निमित्त प्रार्थना केली जाते. दरम्यान आज अटारी-वाघा बॉर्डरवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या सैनिकांना मिठाई भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. भारत पाकिस्तानचे संबंध नेहमीच तणावाचे असतात, मात्र सणासुदीला एकमेकाला शुभेच्छा देण्याची परंपरा कायम असते, त्यामुळेच दरवर्ष भारत-पाक सीमेवर भारतीय सैनिक आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये शुभेच्छांचे आदान-प्रदान होत असते.
दुसरीकडे बांग्लादेश सीमेवर भारतीय सैनिकांनी बांग्लादेशच्या सैनिकांना मिठाई वाटप करत शुभेच्छा दिल्या.